संजय राऊत थोडक्यात वाचले ! : भुजबळांची कबुली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवामुळे खळबळ उडालेली असतांना संजय राऊत हे थोडक्यात बचावले अन्यथा ते देखील पराभूत झाले असते अशी कबुली छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती. यात एकेक मत महत्वाचे असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी रस्सीखेच झाली. यात महाविकास आघाडीच्या ३ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा विजय झाला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी तर भाजपच्या धनंजय महाडीक, अनिल बोंडे आणि पीयुष गोयल यांनी देखील विजय संपादन केला.

यातील सहाव्या जागेवर जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांची जोरदार टक्कर झाली. यात महाडीक यांनी बाजी मारली. या पराभवानंतर दोन्ही बाजूंकडून अनेक नेत्यांनी भाष्य केले. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अतिशय सडेतोड भाष्य केले.

छगन भुजबळ म्हणाले की, आमचे नियोजन चुकले. या निवडणुकीत संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते अशी कबुली त्यांनी दिली. तर संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला. तसेच आम्ही १७० नव्हे तर १८० मतांची तयारी करण्याची गरज होती. आमचे नियोजन चुकले अशी कबुली देखील त्यांनी दिली.

Protected Content