पातोंडा येथे माझी वसुंधरा अभियान योजनेचा सीईओंनी घेतला आढावा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पात्र ठरलेल्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी पथकासह भेट देत पाहणी केली.ह्या भेटीत त्यांनी ग्राम पंचायतीने केलेल्या कामांचा आढावा घेतला.

 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणीय वातावरण बदल विभाग यांच्याकडून माझी वसुंधरा स्पर्धा शहरी व ग्रामीण विभागासाठी वेगवेगळी स्पर्धा माझी वसुंधरा भाग-1 ही 5 वर्षांसाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविली जात आहे.या अभियानात पृथ्वी, जल,वायू,अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ग्राम पंचायतींना कामे करावयाची आहेत. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी पंचतत्वनुसार गुणांची आकडेवारी ठवरली असून अनेक बाबी ठरवल्या गेल्या आहेत.जसे की,हरित आच्छादन व जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन,हवेची गुणवत्ता,जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे, नाले यांची स्वछता, सांडपाणी, मैला, व्यवस्थापन व प्रक्रिया, सौर ऊर्जेवर व एलईडी वर चालणारे दिवे, बायोगॅस प्रकल्पांची उभारणी, हरित इमारती, पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती, निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ आदी बाबतीत कामे करावयाची आहेत. अशा या महत्त्वाकांक्षी ग्रामीण स्पर्धेत पातोंडा ग्राम पंचायतीने सामजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला आहे.

 

जळगाव जिल्ह्यात असे एकूण 48 गावे सहभागी होते. योजनेच्या मुख्य उद्दिष्टे व नियोजित कामांच्या बाबीनुसार  सहभागी ग्राम पंचायतीने कामे केलीत.व केलेल्या कामांचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत होता व त्यानुसार सहभागी गावांनी केलेल्या बाबींच्या गुणांची गुणवत्ता ठरवली जात होती.त्यात पहिल्या टप्प्यातून 48 गावांमधून दुसऱ्या टप्प्यात 12 गावांची निवड झाली असून त्यात पातोंडा ग्राम पंचायतीने बाजी मारली असून दुसऱ्या टप्प्यातून ह्या 12 गावांपैकी विजेती ग्राम पंचायत निवड केली जाणार आहे. पृथ्वीवरच्या पंचमहाभूतांचे अन्यन्य साधारण महत्व असणारे रक्षण करणे व निसर्गाचे समतोल राखणे. या स्पर्धेसाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी,आकाश, या पाच तत्व निश्चित करण्यात आले आहेत.त्यासाठी प्रथम स्तरावर जाणीव जागृती, प्रचार प्रसार करणे व त्यासाठी पुढील घटकावर काम करणे. प्रशासनाने आखून दिलेल्या धोरणानुसार ग्रामस्थरावर योग्य व्यवस्थापण करणे आदी कामे करावी लागणार आहेत.

 

जळगांव जिल्ह्यातील 12 गावांमध्ये पात्र ठरलेल्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी पथकासह भेट देत पाहणी केली.ह्या भेटीत त्यांनी ग्राम पंचायतीने केलेल्या कामांचा आढावा घेतला. दुसऱ्या टप्प्यात गावाची निवड झाल्याने योजनेची मुख्य सूत्रे सांभाळणाऱ्या घनश्याम पाटील व टीम सह ग्रामविकास अधिकारी बी.वाय.पाटील व ग्राम पंचायत पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.व दुसऱ्या टप्प्यात अशीच चांगले कामे करून जिल्ह्यातून माझी वसुंधरा अभियानात ग्रामीण भागातून प्रथम येण्यासाठी सदिच्छा देखील दिल्यात.दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या पाहणीसाठी पुन्हा भेट देण्याचे त्यांनी सांगितले. देऊन आढावा घेतला. पातोंडा गावाचे तरुण या अभियानातून चांगल्या दिशेने कार्य करत असल्याचे त्यांनी कौतुक केले.यावेळी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी,ग्रामविस्तार अधिकारी एल.डी. चिंचोरे,स्वच्छ भारत मिशनचे किरण मोरे,सरपंच भरत बिरारी,ग्रामविकास अधिकारी बी.वाय.पाटील,उपसरपंच नितीन पारधी,ग्रा.प.सदस्य सोपान लोहार,किशोर मोरे,सागर मोरे,सोनू देवरे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content