Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हजारोंना बेघर करून रेल्वेचे जीएम म्हणतात कोच फॅक्टरी निश्‍चित नाही !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे परिसरातील हजारो कुटुंबियांना अतिक्रमणाच्या नावाखाली बेघर केल्यानंतर आज मध्य रेल्वेचे जीएम यांनी कोच फॅक्टरीची उभारणी अनिश्‍चित असल्याचे सांगितल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

याबाबत वृत्त असे की, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) डी.के. शर्मा हे आज भुसावळच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून विविध कार्यक्रमांना हजेरी दिली. यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांना अतिक्रमण हटविल्यानंतर रेल्वे प्रशासन कोच फॅक्टरी केव्हा उभारणार ? अशी विचारणा केली. यावर जीएम शर्मा म्हणाले की, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नसून आगामी सरकार सत्तारूढ झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने कोच फॅक्ट्री येणार अशी आवई उठवून गरिबांना बेघर केल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएम शर्मा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचे आज भुसावळ विभागीय दौर्‍यावर सकाळी ९ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यानंतर ९ ते दीड वाजे दरम्यान रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्याला भेट दिली.दुपारी१-३० वाजेपर्यंत निरीक्षण करणार केले.दुपारी २-४५ ते ४-४५ दरम्यान क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्रात निरीक्षण केले.सायंकाळी ५ते ५-४५ दरम्यान भुसावळ स्थानक, स्थानक परिसर व रेल्वे म्युझियम चे उद्घाटन केले.सायंकाळी ६ ते ६-१५ वाजता नियंत्रण कक्षाचे निरीक्षण करून ६-३० ते ६-४५ मान्यताप्राप्त रेल्वे युनियन पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.रात्री ८ते रात्री१० दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

Exit mobile version