Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्राने दरवाढ मागे घ्यावी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेची मागणी

जळगाव, प्रतिनिधी ।केंद्र सरकारने केलेल्या खाते, इंधन, कृषी उपयोगी कीटकनाशक व जीवनाश्यक औषधींची दरवाढीचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला असून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनाचा आशय असा की,  केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेल ,खते, रासायनिक खते, बी बियाणे यांची दरवाढ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका रोखून धरली होती. परंतु, या निवडणुका आटोपताच दरवाढ करण्यात  आली आहे. ५ दिवसांपूर्वी २००० रुपये किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देवून याची जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र, हा निधी हातात पडत नाही तोच भाववाढ करून  दुसऱ्या हाताने काढून घेतला  आहे.  या भाववाढीचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा जळगाव जिल्हा कौन्सिलतर्फे निषेध करून ही भाववाढ रद्द करावी व महागाईवर अंकुश लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कॉ. अमृत महाजन, कॉ. लक्ष्मण शिंदे, शांताराम पाटील, छोटू पाटील, किसान सभेचे नेते शिवाजी पाटील, जे. डी. ठाकरे, कालू कोळी,किशोर कनडारे, उघडू साठे, राकेश शिंदे, नागदेव सिंधी आदींच्या स्वाक्षरी आहे.        

Exit mobile version