Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रद्धा महिला मंडळातर्फे जागतिक जल दिन व रंगपंचमी साजरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोठारी नगरातील समाज श्रद्धा महिला मंडळातर्फे रंगपंचमी महोत्सव व जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी शिंपी समाजातील सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ऑरगॅनिक रंगद्वारे रंगपंचमी खेळण्यात आली. तर श्रद्धा महिला मंडळाचे अध्यक्ष नेहा जगताप यांनी रंगपंचमी चे महत्व व जल दिवसनिमित्त पाण्याचे दुरुप्रयोग टाळा असे सर्वांना आवाहन केले व सर्वांकडून शपथ घेतली की आपण पाणीचा काटेकोरपणे वापर करणार.

यावेळी कुसुमताई बिरारी, रेखा निकुंभ, आशा जगताप, भाग्यश्री जगताप, रूपाली निकुंभ, वैशाली बाविस्कर, भारती निकुंभ, वंदना जगताप या सर्व समाजाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी मान्यवर म्हणून उपस्थित होत्या यावेळी श्रद्धा महिला मंडळाच्या अध्यक्ष नेहा संतोष जगताप उपाध्यक्ष पूजा भंडारकर, सुनिता बोरसे, सोनाली शिंपी, पूजा सोनवणे, भाग्यश्री मांडगे, जिजाबाई बोरसे, उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन पूजा कापुरे यांनी सांभाळले व आभार प्रदर्शन पूजा भांडारकर यांनी केले.

 

Exit mobile version