Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

एरंडोल प्रतिनिधी । येथे राजमाता जिजाऊ महिला मंडळ व जिजाऊ ब्रिगेड यांचे  संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी मंगळवार रोजी धरणगाव चौफुली येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मनीषा पाटील यांच्या जिजाऊ वंदना गीताने करण्यात आली यानंतर उपस्थित महिला व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी गोपाबाई महाजन, शकुंतला अहिराव, परविन बांधव या महिलांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, एरंडोल महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, शालिग्राम गायकवाड, एपीआय तुषार देवरे, माजी जिप उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, राजेंद्र शिंदे, आनंदा चौधरी, जगदीश पाटील, गजानन पाटील, प्राध्यापक शिवाजीराव अहिराव, मोहन चव्हाण, डॉक्टर किरण पाटील डॉक्टर राजेंद्र देसले डॉक्टर भुषण पाटील अतुल पाटील चिंतामण पाटील राजेंद्र चौधरी भाईदास पाटील प्रशांत पाटील जगदीश ठाकुर के डी पाटील एस  टी पाटील नाना साळुंखे प्रमोद सोनवणे संदीप सातपुते लाळगे, बोरसे, यांचेसह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हर्षदा पाटील परविन बानो साळी मॅडम यांनी  मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय पाटील गोटू पाटील स्वप्नील सावंत राज पाटील पंकज पाटील हेमंत पाटील शरद पाटील रविराज पाटील स्वप्निल बोरसे यांनी परिश्रम घेतले. आभार प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव यांनी मानले.

 

Exit mobile version