Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात भाजपाचा तीन राज्यांतील विजयाचा पेढे वाटून जल्लोष

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आज रोजी चार राज्यांमध्ये निकाल लागला असून यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजय झाला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर देशाच्या विश्वास आहे,  येणाऱ्या २०२४ लोकसभा व विधानसभा ची नांदी ठरू पाहणारी आहे या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने जोरात मुसंडी मारलेली आहे. पारोळा भाजपा तर्फे जल्लोष करण्यात आला. बालाजी मंदिरात जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन नारळ फोडून पेढे वाटप करण्यात आले. आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला बाजारपेठेत बालाजी मंदिर ते नगरपालिका चौक पर्यंत वाजंत्री वाजून पेढे वाटप करण्यात आले भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील तसेच शहराध्यक्ष मनीष भाऊ पाटील, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते किसन लोटू महाजन, प्रकाश लोहार, माजी नगरसेवक सुदाम चौधरी, नगरसेवक भैया चौधरी अनिल टोळकर, सुनील भालेराव, कैलास पाटील, विनोद पाटील, अनिल वाणी, मोहम्मद पठाण, गणेश क्षेत्रीय, विजय जगताप, समाधान धनगर, भूषण महाजन, पांडुरंग पाटील, राजू शिंदे, प्रसाद महाजन, अमोल भामरे, शुभम महाजन, सागर पाटील, सागर लोहार, भुषण पाखले, अक्षय अमृतकर, भूषण पाटील, सागर पाटील, मोठा सागर गढरी, वैभव पाटील, दर्शन पाटील, मुकेश पाटील, भाजपाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version