Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे भारतीय जनता पार्टीचा ४१ वा स्थापना दिन साजरा

फैजपूर प्रतिनिधी । तालुक्यात आज ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ४१ वा स्थापना दिवस कोरोनामुळे मोजक्या कार्यकर्तांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार उपसमिती फैजपूर सभागृहात घेण्यात आला. याप्रसंगी जनसंघ व भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तैलचित्राला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा केंद्र (मोदी)सरकारच्या व्यक्तीगत लाभार्थी योजनाचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत बूथ स्थरावून पोहचविण्यासाठी तसेच शेतकरी विधेयक बाबी व कोरोना नियमावली लसीकरण बाबी जनजागृती कार्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले पाहिजे आणि आपण व आपला परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी सरचिटणीस संजय सराफ यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रतीक वारके, पिंटूभाऊ तेली, राजाभाऊ चौधरी, रामा होले, जितेंद्र वर्मा, संजीव भावसार, मनोज भावसार यासह काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version