Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी विद्या मंदिर शाळेत ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील शिवाजी विद्या मंदिर तांबेपुरा या शाळेत जागतिक चिमणी दिनानिमित्त नुकतेच विविध उपक्रम घेण्यात आले.

 

यावेळी पक्षीमित्र जितेंद्र वाणी यांनी पक्षी छायाचित्र प्रदर्शन भरवले. यावेळी या जागतिक चिमणी दिनाचे महत्व सांगून विविध पक्षांची माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगितली. त्यानंतर पक्षी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती ‘स्लाइड शो’द्वारे दाखवण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिक वैजयंती पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमसाठी महेश निकम,किशोर बडगुजर, राहुल शिरसाठ, काटे मॅडम, प्रफुल्ल बोरसे, किशोर चौधरी, सुलोचना मॅडम , छाया मॅडम, श्री. गुरव सर यांचे सहकार्य लाभले. किशोर बडगुजर यांनी आभार मानले.

Exit mobile version