Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तळेगाव आरोग्य केंद्रात ‘जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिन’ साजरा (व्हिडीओ)

World Population Day 01 620x361

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (दि.११ जुलै) ‘जागतिक लोकसंख्या दिन’ व ‘राष्ट्रीय मातृत्व दिन’ साजरा करण्यात आला.केंद्र सरकारने यंदा आजपासून जागतिक लोकसंख्या नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यासाठी आदेशित केले आहे.

 

आज भारताची लोकसंख्या १३० कोटीपेक्षा जास्त असल्याने सर्वांनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून तांबी, स्रीनिरोध, गर्भनिरोधक गोळ्या, अंतरा इंजेक्शन आदी तात्पुरती साधने अथवा कायमस्वरूपी उपायाचे स्री संततीनियमन शस्रक्रिया हे उपाय महिलांनी अंगिकारण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी यावेळी केले आहे. तसेच पुरूषांनीदेखील निरोध व पुरूष नसबंदी शस्रक्रिया करून लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही त्यांनी नमूद केले.

भारताला विकसित देश बनवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण होणे गरजेचे आहे. तरच सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि गरिबी दूर होईल.’छोटे कुटूंब-महान कुटूंब’ छोटे कुटूंब राहिल्यास सर्वांना न्याय देता येतो व गरजा कमी झाल्याने आर्थिक संकट ओढवत नाही म्हणून सर्वांनी ‘हम दो-हमारे दो’ ऐवजी ‘हम दो-हमारे एक’ चा नारा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. याप्रसंगी राष्ट्रीय मातृत्व दिनानिमित्ताने गरोदर मातांची रक्तलघवी तपासणी व जनरल तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा राजपुत यांनी केली.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य अजय पाटील, सौ. प्रिती विष्णू चकोर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आरोग्य सहाय्यक एल.सी. जाधव, विठ्ठल चव्हाण, सौ. पुष्पा शिनकर, राजू पाटील सौ.एल डी पवार, श्रीमती शितल सोळुंके, सौ. सरला चव्हाण, सौ. सविता परदेशी, सौ. सविता पेंभरे, श्रीमती योगिता शिंदे, श्रीमती सविता राठोड, श्रीमती संगिता कोळी, नितीन तिरमली, मोहन राठोड, विष्णू राठोड, विजय सोनवणे, राकेश पाटील, उदयसिंग पाटील, सुनिल मोरे, चेतन मोरे आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version