Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा

bhusaval

भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे मंडळाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दिव्यांग कर्मचाऱ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला.

प्रस्ताविक एन.डी.गांगुर्डे, सिनी डी.पी.ओ यांनी केले. याप्रसंगी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात व्ही.के समाधिया अध्यक्ष सी.आर.एम.एस, जी.जी. ढोले, एस.बी.एफ. कमिटी सदस्य, मनोज साळुंखे शिक्षक रेल्वे स्कूल, दिलीप पाटील, मुख्य कार्यालय अधीक्षक, पी.के. सामांतराय सी.एम.एस, मनोज  कुमार सिन्हा ए.डी.आर.एम, विवेक कुमार गुप्ता, डी.आर.एम. यांनी मार्गदर्शन
केले.

याप्रसंगी तीन दिव्यांग कर्मचारी प्रमोद कुमार, प्रकाश इंगळे आणि शेख अफजल शेख सिकंदर यांना विवेक कुमार गुप्ता डी.आर.एम यांच्या हस्ते दुचाकी वाहनांची अट्याचमेंट प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कुलकर्णी रेल्वे स्कूल यांनी आणि आभार प्रदर्शन आर.एच. परदेशी, ए.पी.ओ. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन डी गांगुर्डे सिनि डी.पी.ओ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्मिक शाखेच्या सर्व  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version