Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजदेहरे येथे विश्व बंजारा दिन उत्साहात साजरा !

चाळीसगाव प्रतिनिधी । बंजारा समाजाची संस्कृती टिकून राहावी या उद्दिष्टाने सालाबादप्रमाणे ८ एप्रिल रोजी विश्व बंजारा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र यावर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नीने बंजारा समाजाचा पोषाख घालून तालुक्यातील राजदेहरे येथे उपस्थिती लावत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला.

दरवर्षी दि. ८ एप्रिल रोजी विश्व बंजारा दिन म्हणून जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. बंजारा समाजाच्या संस्कृतीची ओळख भावी पिढीला राहावे म्हणून या दिवसाला अधिक महत्त्व देत जल्लोषात साजरा करण्यात येतो. मात्र या वर्षी कोरोनाचा सावट असल्याने बहुतांश ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला नाही. परंतु तालुक्यातील राजदेहरे येथे कोरोना नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्धांगिनी प्रतिभा चव्हाण हिने चक्क बंजारा समाजाचा पोषाख परिधान करून बंजारा समाजाच्या संस्कृतीप्रती आदर व्यक्त करत आनंद घेतला. बंजारा दिवस साजरा करताना यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्धांगिनी प्रतिभा चव्हाण, भाग्यश्री घोंगडे, नमो ताई, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, चेतन चव्हाण, किरण मादोले व शुभम पाटील आदी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version