Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘वंचित बहुजन आघाडी’चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कपिल वस्ती येथे वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा प्रभारी ॲड.रविकांत वाघ यांच्या मार्गदशनाखाली व वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, कामगार नेते बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक राजेद्र बारी, जिल्हा महिला आघाडी महासचिव वंदना आराक, जिल्हा महिला आघाडी संघटक शोभा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे, ग्राम पंचायत सदस्य विजय मालविय, कुणाल सुरडकर यांनी ‘पक्षाचे ध्येय धोरणे, पक्ष वाढण्यासाठी कशाप्रकारे कार्य करावे.’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बहुजन आघाडीतर्फ ‘ई श्रम कार्ड’ मोफत वाटप करण्यात आले. तसेच गौतम लोखंडे व अस्लम भंगरवाले यांनी कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, मेजर रुपेश कुऱ्हाडे, यावल तालुका महासचिव राजेश गवळी,  रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष कोळी, वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच रोहिणी कोलते, ग्राम पंचायत सदस्या पुनम सुरडकर, प्रमिला बोदडे, दिलीप पानपाटील, शरद बोदडे, राहुल गवई, विजय सोनवणे, फैजपूर शहराध्यक्ष सोनु वाघुळदे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गवई यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव वंदना आराक यांनी केले.

Exit mobile version