महावितरणचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महावितरण बुलडाणातर्फे महावितरणचा वर्धापन दिन कर्मचाऱ्यांसाठी सहपरिवार विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाद्वारे जल्लोषात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

दि. ४ ते ५ जून रोजी कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात त्यामध्ये ८० पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेत खामगाव विभागाच्या बी संघाने विजेतेपद पटकावीत चषक आपल्या नावे केले तर बुलडाणा विभागाच्या ए संघाने उपविजेतेपद पटकाविले.

सोमवार, दि. ६ जून सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात महावितरणचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांच्या हस्ते केक कापून १७ वा वर्धापन दिनाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास बांबल व्यवस्थापक (वित्त व लेखा) यांनी केले तर महावितरणचा आजवरचा प्रवास आणि पुढील आव्हाने यावर संजय आकोडे अधीक्षक अभियंता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. महावितरणमुळे आपली कुटुंबे जगत आहेत. असे विचार यावेळी अजितपालसिंग दिनोरे कार्यकारी अभियंता खामगाव यांनी व्यक्त केले.

कर्मचाऱ्यांच्या ताण तणाव कमी व्हावा म्हणून ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हा सिने अभिनेता संदीप पाठक, मुंबई यांचा एकपात्री प्रयोग ठेवण्यात आला. महिलांकरिता आणि लहान मुलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित केला गेला त्यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके देण्यात आलीत. सायंकाळी स्नेहभोजनासहित संगीत रजनीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आलाप म्युझिकल इव्हेंट यांच्या कलाकारांसोबत महावितरणचे अधिकारी / कर्मचारी यांनी बहारदार गीत गायनासोबतच नृत्याचा ठेका धरीत जल्लोषात कार्यक्रम साजरा केला.

कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावर बद्रीनाथ जायभाये का अ बुलडाणा विभाग, प्रशांत गायकवाड का अ (प्रशासन), राजेश मिश्रा प्र.का.अ. मलकापूर विभाग व उच्चदाब ग्राहक राजेश सिन्हा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश बंगाळे सहायक अभियंता यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीष कदम प्र व्यवस्थापक मा.सं. यांनी केले. यावेळी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

Protected Content