Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. आचार्य विद्यालयात संस्कृत दिन अन रक्षाबंधन उत्साहात साजरे (व्हिडीओ)

dr. aacharya vidyalay

 

जळगाव, प्रतिनिधी | येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागात नुकताच संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमात सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ. योगिता शिंपी आणि सौ. पूजा साळवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सौ. मीना मोहकर यांनी संस्कृत दिनाचे महत्व विषद केले. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत सादर केले. त्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सौ. प्रतिभा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची गोष्ट सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सगळ्या शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

 

Exit mobile version