Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात अनोख्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथे शिवसेना, युवासेनेच्या अनोख्या संकल्पनेतून हुतात्मा स्मारकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील १०७ हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

पाचोरा येथील शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने सुधीर पाटील उर्फ गजू पाटील यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. येथील शैलेश कुलकर्णी यांनी १५ फूट ×१० फूट महाराष्ट्राच्या नकाशाची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या सहाय्याने साकारली होती. नकाशाच्या कडेने १०७ हुतात्म्यांच्या नावाने प्रत्येकी एक दिवा कोरोना योद्धा असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्रजल्वित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. अनिल झवर, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, डॉ. भरत पाटील व्यासपीठावर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात किशोर पाटील यांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरा व कोरोनायोद्धांचे कोरोना काळातील योगदान याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. दिनेश सोनार व तहसिलदार कैलास चावडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी देशभक्तीपर गीतांमुळे चैतन्यदायी वातावरणाची निर्मिती झाली होती. तसेच यावेळी गजु पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन गजू पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. नरेश गवांदे, डॉ. दिनेश सोनार, डॉ. इम्रान पिंजारी, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. सुनिल गवळी, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. अतुल पाटील, डॉ. कुणाल पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. गोरख महाजन, दशरथ वाणी, विकास पाटील, नरेंद्र पाटील, डॉ. हर्षल देव, डॉ. संजय चौधरी, डॉ. दिपक चौधरी व पाचोरा शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, पोलिस कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बारावकर, बंडू चौधरी, राजू सूर्यवंशी, जितेंद्र जैन, सुमित पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव पाटील, भुषण पेंढारकर, वैभव राजपूत, मनोज पाटील, योगेश पाथरवट यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version