Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरा करा – डी.वाय.एस.पी डॉ. कुणाल सोनवणे

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोठा वाघोदा येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ आणि शांतता समितीच्या बैठकीचे नूतन ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजन  करण्यात आले होती.

या बैठकीत फैजपूर तथा मुक्ताईनगरचे डिवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांचा सत्कार सरपंच मुबारक तडवी, सपोनि डी.डी.इंगोले याचा सत्कार किशोर पाटील व कालु मिस्त्री तर उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचा सत्कार उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी कुलदीप पाटील यांनी केला. शेतकरी डी.के महाजन, किशोर जगन्नाथ पाटील, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कुलदीप जगदीश पाटील आदींनी पोलिस अधिकारी यांचे स्वागत केले.

अध्यक्षीय भाषणातून डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना गणेश उत्सव मोठ्या आनंदाने व हर्षोल्हासात करा पण कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करा. इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच सामाजिक उपक्रम, विविध मदतपर, रक्तदान शिबीर प्रोत्साहनपर उपक्रम आयोजित करावीत. जातिय सलोखासारखे जनजागृतीपर आरास साकारीत प्रबोधनात्मक प्रतिकृती साकारण्यावर भर द्यावा. असे आवाहन गणेश मंडळांना केले.

यावेळी पोलीस पाटील दिपक पाटील, माजी सरपंच राजेंद्र सावळे, उत्तम वाघ, पत्रकार शाकिर मलिक, योगेश पाटील, सुरेंद्र शिरनामे, सवाज फतरु तडवी, बिकारी न्यामत तडवी, सुनिल पाटील, राहुल महाजन आदींसह गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version