Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढदिवसानिमित्त जेवण वाटप ; कौतुकाचा वर्षाव

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा दिपीका भामरे यांनी वाढदिवस साजरा न करता झोपडपट्टीतील अत्यंत गरिबांसाठी एक वेळचे जेवण वाटप केले आहे. 

शहरात कोरोना महामारीमुळे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशा वेळेस वाढदिवसच आनंद न घेता गोर गरिबांना एक वेळेचे पोट भरून जेवण मिळणे खूप कठीन झाले आहे.  अशा वेळेस आपला वाढदिवसानिमिताने एक वेळेचं जेवण गरजू ,गरीब लोकांना दिले. 

कु. दीपिका भामरे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर समजामध्ये एक आगळ्या-वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची पद्धतमुळे नवं युवक व नवयुवतीमध्ये आदर्श वाढणार आहे. समाजातील युवकांना हा प्रेरणादायी वाढदिवस एक नवीन संकल्पना, नवीन विचार व *हजारो रुपये विनाकारण खर्च करण्याऐवजी साधे पणाने सर्वांनी वाढदिवस साजरा करावा.

 

 

Exit mobile version