‘औषधे विक्री करणाऱ्या दुकानाच्या आत व बाहेर CCTV कॅमेरे बंधनकारक’ – जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानांच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही ? याबाबत पडताळणी व दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागास राहिल. आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

‘लहान मुलांना ‘Shedule H, H 1 व X’ औषधे हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय सहज उपलब्ध होत असून त्यांचे सेवन केल्यामुळे लहान मुले अशा औषधांवरच अवलबून राहत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांचेकडील संयुक्त कृती योजना अहवालामध्ये दिसून आले आहे.

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय ‘Shedule H, H 1 व X’ या औषधांची विक्री  करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी विक्री करणाऱ्या दुकांनावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची जळगावचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांनी विनंती केलेली आहे.

‘Shedule H, H 1 व X’ औषधे व Inhaler ची विक्री करणाऱ्या सर्व घाऊक / किरकोळ / होलसेल औषधे विक्री करणाऱ्या दुकानाच्या आत व बाहेर CCTV  कॅमेरे लावणे बंधनकारक राहील. सदरचा आदेश निर्गमित झाल्याच्या एक महिन्याच्या आत सर्व घाऊक / किरकोळ/ होलसेल औषधी विक्रेते यांनी दुकानात CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानांच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही ? याबाबत पडताळणी व दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागास राहिल. सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content