Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीबीआयचे महाराष्ट्रासह देशभरात छापे

cbi

मुंबई प्रतिनिधी । पीएमसी बँकेचा घोटाळा ताजा असताना सीबीआयने महाराष्ट्रासह देशभरात छापे टाकून मोठी कारवाई केलीय. देशभरातल्या विविध बँकांमध्ये तब्बल 7 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा समोर येत असून त्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 169 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

बँक घोटाळ्यांच्या 35 प्रकरणी सीबीआयकडे गुन्हा नोंदवला गेलाय. त्याच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली असून विविध राज्यांमध्ये 169 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या सीबीआयने आक्षेपार्ह कागदपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागदपत्र जप्त केली आहेत. या घोटाळात सामान्य ठेविदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बँकांमध्ये लोकांना पैसे काढणेही अवघड झाले आहे. अशा घटना घडत राहिल्याच लोकांचा बँकिंग सिस्टिमवरचा विश्वासच उडण्याची भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे सर्वच बँकांनी आपल्या व्यवहारात सुधारणा करत पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

महाराष्ट्रात झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी 8व्या खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एंड्रयू लोबो नावाच्या एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एंड्रयू यांच्यावर उपचार सुरू होते. पण पैसे न मिळण्याच्या भीतीमुळे ते तणावात होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या मंगळवारी कुलदीप कौर विज (64) यांचे नवी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यापूर्वी फट्टोमल पंजाबी, संजय गुलाटी, मुरलीधर धरा यांच्यासह भारती सदरंगानी नावाच्या वृद्ध महिलेचादेखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version