Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावधान : वाढू लागलाय कोरोनाचा प्रकोप !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या आपल्याकडे कोरोनाची रूग्णसेवा लक्षणीय प्रमाणात घटली असली तरी देशातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या वाढीस लागल्याचे दिसून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

 

देशातील काही भागांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या वाढीस लागली आहे. देशात गेल्या २४ तासात देशात १ हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्याआधी सोमवारी २ हजार १८३ नव्या रुग्णांची   भर पडली होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९२८ लोक बरे झाले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४,३०,४५,५२७ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. देशाता ११,८६० सक्रिय कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या आता ५,२१,९६६ इतकी झाली आहे. अल्प प्रमाणात का असेना, पण पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळतंय.

 

दरम्यान, ही वाढ चिंताजनक नसली तरी केंद्रीय मंत्रालयानं याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा काही प्रमाणात तरी निर्बंध लागू होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version