Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावधान : चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दहा हजारांचा दंड

aadhar card

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

दिलेल्या पुढील कारणामुळे दंड भरावा लागेल :- पॅनच्या जागी चुकीचा आधार नंबर दिल्यावर, मोठ्या रकमेच्या व्यवहारावेळी आधार किंवा पॅन नंबर दिलेला नसल्यामुळे आणि फक्त आधार नंबर देणे पुरसे नाही. तर तुम्हाला बायोटमेट्रीक आयडेंटिटी ऑथेंटिकेट करावी लागेल. पण ती करता नाही आली तर दंड भरावा लागेल. याशिवाय तुम्ही दोन फॉर्म्सवर चुकीचा आधार नंबर दिला, तर तुम्हाला प्रत्येकी १०-१० हजार रुपये असे २० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यामुळे फॉर्म भरताना आधार नंबर अचूक असेल याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

वित्त विधेयक २०१९ मधील १९६१च्या नियमातील दुरुस्तीनुसार पॅन कार्डनंबर ऐवजी आधार नंबर वापरण्यास नागरिकांना मंजुरी देण्यात आली आहे. पण चुकीचा आधार नंबर दिल्यास १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आलीय. पॅन ऐवजी तुम्ही आधार नंबर देत असाल त्यावेळी हा नियम लागू होतो. कर परतावा भरताना, बँक खातं, डिमॅट अकाउंट आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकचे म्युच्युअल फंड किंवा बॉण्ड खरेदीवेळी पॅन नंबर बंधनकारक आहे, असे आयकर विभागाने म्हटलंय. आधार नंबर हा युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) देण्यात येतो. या प्रकरणात युआयडीएआय दंड करत नाही तर आयकर विभाग करतो. करदाता पॅन नंबरच्या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास त्याला दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम १० हजार रुपये आहे.

Exit mobile version