सावधान !… जिल्ह्यात दिवसभरात २८५ कोरोना रूग्ण आढळले; एका बाधिताचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रूग्ण संख्येत कमालीची वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात २८५ रूग्ण आढळून आली आहे. तर जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यातील रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.  अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content