Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; वाहन सोडून चालक पसार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फुपनगरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी ट्रॅक्टर सोडून चालक पसार झाला आहे. जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फुपनगरी शिवारात असलेल्या गिरणा नदीपात्रातून काहीजण बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याचे आदेश देत पथक रवाना केले. गिरणा नदीपात्र जवळील स्मशानभूमी समोरून रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर (एमएच १९, बीसी ३०४२) जात असताना पोलिसांनी कारवाई केली. पोलीसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसोडून पसार झाला आहे. पोलीसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दिपक साहेबराव कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय दुसाने करीत आहे.

 

Exit mobile version