Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांनी पकडले निर्दयपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातून गुरांची निर्दयपणे वाहतूक करत असताना एका आयसर गाडीला शहर पोलीसांनी आज दुपारी पकडले असून याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील दयानंद हॉटेल समोरच्या रस्त्यावरून गुरांना निर्दयपणे गाडीत कोंबून आयसरमध्ये (क्र. एम.एच.१८ बीजी ५३७७) घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळताच त्यांनी आयसर गाडीस पकडले.

ही कारवाई आज दुपारी १:१० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बिरारी व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली. याप्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील ड्रायव्हर साहील उर्फ सिकंदर खान रफिक (वय-१८) आणि मुक्तार उर्फ बबलु युसुफ खान (वय-४०) तसेच सोनागिर येथील गुरांचे मालक फिरोज यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्थानकात प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ३ (११) डी,इ,एफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

Exit mobile version