वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर पकडले; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील स्मशानभूमी परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर शहर पोलीसांनी पकडले असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे गुरूवार २ जून रोजी मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळील रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ३९१७) मधून बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीसांनी डंपर थांबवून वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानुसार वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डंपर जप्त करण्यात आले.

याप्रकरणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडूरंग आनंदा सोनवणे (वय-२२) रा. खेडी ता. जळगाव आणि छोटून एकनाथ सपकाळे रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

 

Protected Content