Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला; दोन जण ताब्यात

रावेर प्रतिनिधी । मध्यप्रदेशातून राज्यात येणाऱ्या गुरांना निर्दयीपणे कोंबून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पाल पोलीसांनी पकडला आहे. यात दोन जणांना ताब्यात घेतले असून गुरांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात येणाऱ्या गुरांना निर्दयी पणे कोंबुन अवैध वाहतूक करणारा ट्रक  शेरी नाकामार्गे (एमपी १७ एचएच १८०३) हा ट्रक सुमारे ५० गुरांची अवैध पध्दतीने कत्तलीसाठी जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पाल पोलिस चौकीचे पॉहेकॉ राजेंद्र राठोर, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, पोकॉ दिपक ठाकुर, पोलीस नाईक अतुल तडवी, पो. कॉ. संदीप धनगर यांनी सापळा रचून ट्रक आडविला आहे. यात ४५ गुरांची सुटका करणयत आली आहे तर चार मयत झाली होती.  यामध्ये सुमारे ४५ गुरे असून चार मयत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रक औरंगाबाद येथे कत्तलीच्या फॅक्टरीत जात होता.  ट्रक चालक नसीम खान अकबर खान (वय २७) झुबेर खान रफीक खान (वय २१) (रा करमेळी जि. विदिशा मध्यप्रदेश) दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.  ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुरांना जळगाव बाफना गौ-शाळेत रवाना करण्यात येणार आहे. कारवाई पहाटे ५ वाजता करण्यात आली असून कारवाई बाबत पशुप्रेमींमध्ये समाधान आहे. मध्य प्रदेश कडून मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची तस्करी होते. याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमीनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version