सामाजिक

धरणगाव सामाजिक

धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथे थोर समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. तसेच नगरपालिकेतर्फे प्रशासकीय इमारत सभागृहातील कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी संत गाडगे महाराज याचा प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी भाजपा गटनेते कैलास माळी व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश घरोघरी पोहचवा असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, नूतन विकास सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन धीरेंद्र पुरभे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, नंदू पाटिल, परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र […]

धरणगाव सामाजिक

धीरेंद्र पुरभे यांचा परिट समाजातर्फे सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परीट समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिरीष बयस, नूतन सोसायटी संचालक निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भगवान महाजन, शैलेंद्र चंदेल व सर्व सचालक उपस्थित होते.

अमळनेर सामाजिक

संत गाडगेबाबांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी : दिलीप सोनवणे (व्हिडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी) साधी राहणी ,आणि उच्च विचारसरणीचे संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय,आणि सुधारणा व स्वच्छता यामध्ये जास्त रुची होती. त्यांचे कार्य संपूर्ण बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. ते अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय व डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शासकीय प्रतिमा वाटप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून  बोलत होते.   व्यासपीठावर साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यां उपाध्यक्षा प्राध्यापक डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,विश्वस्त बापू नगावकर ,परीट समाजाचे अध्यक्ष […]

अमळनेर शिक्षण सामाजिक

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबा यांचे कार्य समाजाला दिशा देणारे : अनिल महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) संत गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदर भाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे कार्य मोलाचे व समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ते संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले प्रतिमेला माल्यार्पण ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले. व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के , शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन,एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख होते. यावेळी श्री.महाजन पुढे म्हाणाले की, संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र केलेली स्वच्छतेची जनजागृती त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे एकमेव […]

जळगाव सामाजिक

जळगावात पाकिस्तानच्या निषेधार्थ भव्य मोर्चा (व्हीडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंच व स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला दुपारी घाणेकर चौकातील चौबे शाळेपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा मोठा झेंडा रस्त्यावर अंथरून त्याला पायदळी तुडवण्यात आले. आज दुपारी ४ वाजता हा मोर्चाला चौबे शाळेपासून सुरूवात झाली. हा मोर्चा घाणेकर चौक,टॉवर चौक, नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक,स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापासून हा मोर्चा शहरात फिरला. यावेळी मोर्चेकर्यांनी पाकिस्तान व दहशतवाद विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या मोर्चात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहा– हा व्हिडीओ.

जळगाव सामाजिक

जळगावात दहशतवादविरोधी मोर्चाला सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देश्यीय संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादविरोधी मोर्चाला नुकतीच सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पुढाकाराने शहरातून हा मोर्चा निघत आहे. आज दुपारी ४ वाजता हा मोर्चाला चौबे शाळेपासून सुरूवात झाली. हा मोर्चा घाणेकर चौक,टॉवर चौक, नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक,स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. येथे विविध वक्ते मनोगत व्यक्त करतील. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्च्यात शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

जळगाव शिक्षण सामाजिक

विद्यापीठात मौलाना आझाद यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी

  जळगाव (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने सिटीझन फोरमतर्फे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे अभ्यास आणि संशोधन (अध्यासन ) केंद्र सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठात महात्मा गौतम बुद्ध अध्यासन, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन, महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन, स्वामी विवेकानंद अध्यासन, महात्मा गांधी अध्यासन, सानेगुरुजी अध्यासन आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी अध्यासन अशी महापुरुष, संत, विचारक व अभ्यासक यांच्या नावाने एकूण सात अध्यासने आहेत. या अध्यासनांमार्फत त्या महापुरुषांचे कार्य, त्यांनी मांडलेले विचार, त्या विचारांचे समकालीन महत्त्व याबाबत अभ्यास आणि संशोधन केले जाते. तरी विद्यापीठातील इतर […]

धरणगाव सामाजिक

धरणगावात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवराय व संत रविदास जयंती उत्सवानिमित्त धरणगाव शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले.बालाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने रॅलीची सुरुवात मान्यवर व शिवजयंती उत्सव समिती धरणगावच्या पदाधिकाऱ्यांनी केली.   बालाजी मंदिर , धरणी चौक , कोट बाजार , लांडगे गल्ली , परीहार चौक , शिवराय स्मारक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पुन्हा छत्रपती शिवराय स्मारक असा रॅलीचा मार्ग होता.छत्रपती शिवराय व संत रविदास यांच्या प्रतिमेचे ट्रॅक्टर , बग्गीवर माँसाहेब जिजाऊ व बाल शिवराय यांचा सजीव देखावा , घोड्यावर शिवराय व त्यांच्यासोबत मावळे यांचा सजीव देखावा , महिलांचे पथक , महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे झेंडा पथक , ढोल […]

पाचोरा शिक्षण सामाजिक

जागृती विद्यालयात शिवाजी महाराज आणि संत रविदास जयंती साजरी

पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र आयोजित व येथील जागृती विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्र संत रविदास महाराज जंयती साजरी करण्यात आली. यावेळी पुलवामा येथील अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शहीद जवानांना शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन, माऊली जिल्हाध्यक्ष माळी समाज संघटना व देविदास थोरात यांनी आपल्या शाहीरीतून श्रध्दांजली अर्पण केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडाही त्यांनी सादर केला. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार अमित भोईटे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, डॉ.प्रविण माळी, व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र माधव लकडे, अॅड. योगेश जे. पाटील, सचिव विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, आर.एस. वाणी मुख्याध्यापक जागृती विद्यालय, कुंदन […]

भुसावळ सामाजिक

बारसे दाम्पत्याचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । मेहतर वाल्मीकी व सुदर्शन समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन संतोष बारसे आणि नगरसेविका सोनी बारसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. मेहतर वाल्मिकी व सुदर्शन समाजाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवारी शहरातील टी.व्ही.टॉवर मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारण्यांमुळे हा कार्यक्रम न झाल्यामुळे नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी मेहतर वाल्मिकी समाजाच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर निवेदन दिले. यामध्ये विविध मागण्यात करण्यात आल्या आहेत. यात वाल्मिकी मेहतर समाज हा उपेक्षित घटक असून समाजाच्या प्रतिनिधीला सत्तेत सहभागी करून घ्यावे, सफाई कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरावीत, वारसा नोकरी देताना शैक्षणिक पात्रता पाहून पदे द्यावीत, गटारी, […]