कृषी

कृषी राज्य

शेतकर्‍यांचा लाँग मार्च मुंबईकडे रवाना

नाशिक प्रतिनिधी । अखील भारतीय किसान सभेतर्फे विविध मागण्यांसाठी आज मुंबईकडे लाँच मार्च सुरू करण्यात आला असून यात आदिवासी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देत मागण्या मान्य केल्या. त्यास वर्ष होत आले तरी अद्याप काही मागण्या बाकी असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चेकर्‍यांशी वाटाघाटी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकला […]

कृषी पाचोरा

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला सिल

पाचोरा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जळगाव पिपल्स बँकेची पाच कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आज दुपारी २.०० वाजेच्या सुमारास जळगाव पीपल्स बँकच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या कार्यालयाला सिल ठोकले आहे. यामुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर दि जळगाव पिपल बँकने केलेल्या कारवाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी व हमाल यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. या कारवाईच्या भूमिकेकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे व उपसभापती विश्वासराव भोसले हे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामध्ये हमाल मापाडी महिला कामगार मजूर असे 200 कर्मचारी आहेत व पंचवीस दुकाने असे कृषी उत्पन्न […]

अमळनेर कृषी सामाजिक

आ. चौधरींच्या हस्ते मुडी येथे मानमोडी नाला खोलीकरणाचा शुभारंभ

अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मुडी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मानमोडी नाला खोलीकरणाच्या कामाचा आ. शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मानमोडी नाला हा लवकी नाल्यास जोडणारा नाला असल्यामुळे दोन्ही नाल्यांच्या काठावरील शेतीला एकप्रकारे सिंचनाची संजीवनी मिळून शेतकरी बांधवांना विशेष लाभ होणार आहे.   गेल्या काही वर्षांपासून मानमोडी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या नाल्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी होऊन परिणामी जलसिंचन होत नव्हते, यामुळे शेती पिकासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता, ही बाब आ. चौधरी यांनी लक्षात घेऊन जलयुक्त शिवारअंतर्गत या नाल्याच्या खोलीकरणास मंजुरी मिळविली असून जोमाने काम सुरु झाले आहे. तसेच या नाल्याजवळील लवकी नाल्यावर आ. चौधरींच्याच प्रयत्नाने […]

कृषी जळगाव राजकीय

सहकरातुन विकास साधता येतो : ना.गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) सहकार हा विकासाचा आत्मा आहे. सहकारात पारदर्शीपणा ठेवून एकमेकांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने विकास साधता येतो. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शिव पानंद रस्ते विकासासाठी सहकार्य केल्यास शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी किनोद येथे कृ.ऊ.बा. च्या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किनोद येथे उपबाजार आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कृउबा सभापती लक्ष्मण पाटील […]

कृषी राज्य

वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.   शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सर्व्हे करण्यात आलेला असून २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरतांना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून या […]

अमळनेर कृषी

ध्येय व चिकाटी हीच यशाची पायरी –गोकुळ बोरसे

अमळनेर प्रतिनिधी । यश अपयश हे नशिबावर अवलंबून नसून ते ध्येय्य व चिकाटीवर अवलंबून असते.यासाठी कुठल्याही क्षेत्रात ध्येय्य निश्चित असल्याने यशाची पायरी आपोआप चालत येते असे प्रतिपादन शेतकी संघाचे माजी चेअरमन गोकुळ बोरसे यांनी केले. ते कळमसरे ता.अमळनेर येथे पिकविम्याचा लाभ मिळवून देणाऱ्या शेतकऱ्याच्या सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रल्हाद महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गडखांब येथील गोकुळ बोरसे,निम्भोरा येथील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र राजपूत यांची उपस्थिती होती. मागील वर्षी रब्बी हंगामात मंजूर झालेला पीकविम्यात अमळनेर तालुक्यातील अठरा गावाची नावे गायब झाल्याने शेतकरी पीकविमा लाभापासुन वंचित राहिले होते. परिणामी तालुक्यातील […]

कृषी मुक्ताईनगर

रूईखेडा येथील चंद्रशेखर बढे यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत २०१५-१६ या वर्षाचे कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांना उद्यान पंडीत पुरस्कार घोषित झाला आहे. शेती व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध विभागातून पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१५-१६च्या पुरस्कारात जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर बढे यांनी कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेे. नावीन्यपूर्ण प्रयोगातून ते आधुनिक शेती करीत आहेत. त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार घोषीत झाला असून याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

कृषी रावेर

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ऑनलाईन नोंदनी केलेल्या २६५ शेतकर्‍यांची दोन कोटी आठ लाख ९३ हजार ३८० रुपयांची ज्वारी व मका खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी १ कोटी ८४ लाख ९ हजार ६८० तर मका २४ लाख ८३ हजार ७०० रुपयांची खरेदी केली आहे. गत वर्षाच्या तुलनेत मक्याची खरेदी कमी प्रमाणात झाली असुन ज्वारीची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी शासकीय भावात विक्री केली. यामध्ये ७ हजार ५७६ क्विंटल ज्वारी तर १ हजार ४६१ क्विंटल मका खरेदी विक्री संघातर्फे खरेदी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०१८ अखेर पर्यंत खरेदी झालेल्या ज्वारी व मकाचे १ कोटी ५९ लाख ४८ हजार ३३० रुपये […]

कृषी राज्य

राजू शेट्टींचे आंदोलन तूर्त स्थगित

पुणे प्रतिनिधी । साखर आयुक्तांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ऊस उत्पादकांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची दोन वेळा साखर आयुक्तासोबत चर्चा देखील झाली. या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने राजू शेट्टी यांनी जागेवरून कोणत्याही परिस्थितीमध्ये हटणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली […]

कृषी राज्य

शेतकर्‍यांना मदतीचा पहिला टप्पा जाहीर

मुंबई प्रतिनिधी । राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या १५१ तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मदतीचा पहिला टप्पा देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना २ हजार ९०० कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शेतकर्‍यांना दोन टप्प्यात मिळणार असून हे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. हंगामी पीक उत्पादक शेतकर्‍यांना कमीत कमी १ हजार रुपये तर फळबाग शेतकर्‍यांना कमीत कमी दोन हजार रुपये मिळणार आहेत. हंगामी पीक घेणार्‍या आणि दोन हेक्टरपर्यंत पात्र असलेल्या शेतकर्‍यांची संख्या अंदाजे २१ लाख ३८ हजार ९७० इतकी आहे. तर फळबाग आणि दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या पात्र शेतकर्‍यांची संख्या अंदाजे ८ लाख ८ हजार ५५ इतकी […]