अर्थ

Uncategorized अर्थ राष्ट्रीय

देशातील १२ कोटी शेतकर्यांना रविवारी ‘किसान सन्मान निधी’ मिळणार

लखनऊ (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘किसान सन्मान निधी योजना’ शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. मोदी सरकार रविवारी या योजनेचा पहिला हफ्ता देणार आहे. गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेद्र मोदी एका क्लिकवर देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक आहे. या योजनेंवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान रविवारी जारी करणार आहेत. ही रक्कम छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. भाजपाचे खासदार आणि किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी […]

अर्थ क्राईम राष्ट्रीय

चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याच्या आरोपाखाली चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,चंदा यांच्या विरोधात आता सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.   व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी […]

अर्थ जळगाव

जळगाव महापालिकेचा २३१ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विशेष स्थायी समिती सभेत सन २०१९-२०२० साठी १११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. कुठलीही करवाढ या अंदाजपत्रकात सुचवण्यात आलेली नाही. २३० कोटी ९२ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. अमृत योजनांचा निधी व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निधीमुळे अंदाजपत्रकाची रक्कम वाढली आहे. आज (बुधवारी) स्थायी समितीची सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपा प्रभारी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुनील गोराणे हे उपस्थित होते. महापालिकेचे अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक २३० कोटी ९२ लाख इतकी आहे. त्यात प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २८० […]

अर्थ जळगाव

अकोला जनता बँकेची एटीएम सेवा सुरु

जळगाव (प्रतिनिधी) दी अकोला जनता सहकारी बँकेच्या जळगाव शाखेने आज ग्राहकांच्या सेवेत एक पाऊल पुढे टाकले असून आजपासून बँकेने ए टी एम सेवा सुरु केली आहे. या सेवेचा शुभारंभ बँकेचे सल्लागार समिती सदस्य रामविलास राठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. या ए टी एम मध्ये सगळ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जाणार असून ग्राहकांनी या सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

अर्थ जळगाव

जिल्ह्याच्या विकासात बँकांचे योगदान महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी किशोर राजे‍ निंबाळकर

जळगाव (प्रतिनिधी) सुशिक्षित बेरोजगारांना कर्जपुरवठा प्राप्त झाल्यास जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. याकरीता बँकांनी सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्याने कर्जपुरवठा करुन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे. जिल्हास्तरीय बॅकर्स सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रिझर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. […]

अर्थ जळगाव

उद्यापासून महापालिकेची जप्ती मोहीम

जळगाव ( प्रतिनिधी ) शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी देण्यात आलेली ३१ डिसेंबरची मुदत संपली असून ज्यांनी आपले कर भरले नसतील अशा नागरिकांना जप्तीचे वारंट बजावण्यात आले आहेत. तरीही अद्याप बऱ्याच मिळकत धारकांनी आपला कर भरला नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार उद्यापासून (दि.८) शहरात वाजत-गाजत जप्तीची कारवाई सुरु केली जाणार आहे. तरी थकबाकीदार नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर आपला कर भरून सहकार्य करावे व जप्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्थ

‘अंतरिम अर्थसंकल्पा’विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेवटच्या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपेरणी करत लोकानुनयी घोषणांचा पाऊस पाडला. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्याच्या काही तासातच सर्वोच्च न्यायालयात अर्थसंकल्पाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्प असंविधानिक असल्याची याचिका मनोहर लाल शर्मा यांनी केली आहे. शर्मा यांनी अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी करताना म्हटले आहे की, ‘अंतरिम अर्थसंकल्पासाठी राज्यघटनेत कोणतीही तरतूद नाही. राज्यघटनेत केवळ संपूर्ण अर्थसंकल्प आणि व्होट ऑफ अकाऊंटसाठी तरतूद आहे.   अधिक माहिती देताना शर्मा म्हणाले की, सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्प हा वर्षभरासाठी असतो. तर […]

अर्थ

अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा-अशोक जैन

जळगाव प्रतिनिधी । आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गियांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात अशोक जैन म्हणाले की, हंगामी अर्थमंत्री म्हणून पियूष गोयल यांनी स्वत: लेखा परीक्षक (सीए) असल्याने त्यांच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करून अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात समाजाच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आजचा अर्थसंकल्प आहे. शेतकर्‍यांसाठी विविध योजनांची घोषणा अर्थमंत्री पियूष गोयल यांनी केली आहे. अल्प-भूधारक शेतकर्‍यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्याने शेतकर्‍यांच्या […]

अर्थ राज्य

सातव्या वेतन आयोगाचा अध्यादेश जारी

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग जाहीर केला तरी याबाबतचा अध्यादेश जारी होत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. ती बाजूला सारत सातव्या वेतन आयोगाचा तब्बल 332 पानांचा अध्यादेश तातडीने जारी करण्यात आला आहे. सरकारने १ जानेवारी २०१६ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ १ जानेवारी २०१९ पासून देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात १० हजार कोटींची तरतूदही केली होती. दरम्यान वित्त विभागाकडून आदेश जारी करण्यास विलंब झाल्याने आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल तर जानेवारीच्या […]

अर्थ रावेर

रावेर मर्चंटस सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी मनवाणी

रावेर प्रतिनिधी । शहरातील दि रावेर मर्चन्टस् को-ऑफ क्रेडीट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या तज्ञ संचालक पदी प्रतिष्ठीत व्यापारी व सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा रावेर गोशाळेचे खजिनदार विजय मुरलीधर मनवाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे संस्थेच्या मासिक बैठकीत संचालक अ‍ॅड प्रवीण पाचपोहे यांनी विजय मनवाणी यांना तज्ञ संचालक घेण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला. याला सर्वानी अनुमती देऊन निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय गंगाधर वाणी तर संचालक सुरेश गणपत वाणी,निलेश भास्कर पाटील,यशवंत वासुदेव दलाल,रमेश मुरलीधर रायपूरकर,संतोष रामकृष्ण पाटील वसंत लहानु पाटील,देवानंद प्रल्हाद गजरे,सौ ज्योती दिनकर वाणी तर तर तज्ञ संचालक शिरीष जगन्नाथ वाणी यांनी अभिनंदन केले सदर सभेचे कामकाज मुख्य कार्यकारी […]