Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलीला मारहाण करून मोबाईलसह रोकडची जबरी चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीला मारहाण करून आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत हातातील मोबाईल आणि २० हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरात रविंद्र काळू पाटील (वय-६३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ८ जून रोजी बी.जे. मार्केटमधील कौटुंबिक न्यायालयासमोर रविंद्र पंडीत पाटील याने रविंद्र काळू पाटील यांच्या मुलीला मारहाण करून तिच्या हातातील ९ हजाराचा मोबाईल आणि २० हजाराची रोकड जबरी हिसकावून चोरून नेला.

याप्रकरणी रविंद्र काळू पाटील यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविंद्र पंडीत पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

 

Exit mobile version