Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाबळ परिसरातून एकाजवळील ९८ हजार रुपयांची रोकड लांबवली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील महाबळ परिसरात घारपुरे  स्वीट मार्ट जवळून एकाच्याजवळून ९८ हजार रुपयाची रोकड लांबवण्याची घटना घडली आहे.  याबाबत शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,आनंद रमेशचंद्र जैन वय-४९, रा. महाबळ कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला असून खाजगी व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता ते महाबळ परिसरातील घारपुरे स्वीट मार्ट जवळून जात असताना त्यांच्या जवळील ९८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी  चोरून लांबल्याची घटना घडली आहे.  या संदर्भात त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करत आहे.

Exit mobile version