Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात व्यवसायिकाच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मदिना नगर भागात एकाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने व चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ६८ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन खान खान यासीन खान (वय-४५) रा. मदिना नगर जामनेर हे भांडेविक्री करण्याचे काम करतात. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि १७ हजार रुपयांची रोकड असा ६८ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेलाच्या प्रकार समोर आला आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हसन खान यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयेंद्र पगारे करीत आहे.

Exit mobile version