Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाणी पुरवठा उपअभियंत्यांची घरासमोर उभी कार लंपास; गुन्हा दाखल

FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी शिवार येथील शिवधाम अपार्टमेंटमध्ये राहणारे जि.प. पाणी पुरवठ उपअभियंता यांची घरासमोर उभी दीड लाख रुपये किंमतीची कार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडली आहे.  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील निमखेडी शिवार येथे प्लॅट नं 101 येथे शिवधाम अपार्टमेंट, प्लॉट नं 28 गट पं 118/3 येथे पाच वर्षापासून रमेश पिंताबार वानखेडे हे परिवारासह वास्तव्यास आहेत. ते एरंडोल येथे जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. 15 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांनी अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागेत त्यांच्या मालकीची एम.एच.19 सीएफ 0012 ही कार उभी केली होती. याच कारच्या शेजारी त्यांनी त्यांच्या ऑफिसचीही कार उभी केली होती. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी वानखेडे हे नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाले. घराबाहेर आल्यावर त्यांना ऑफिसची कार उभी होती. मात्र वानखेडे यांच्या स्वतःच्या मालकीची कार दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूला सर्वत्र शोध घेतला, त्यांना कार कुठेही मिळून आली नाही. कार चोरट्यांनी लांबविल्याची खात्री झाल्यावर त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहेत.

Exit mobile version