Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगरात कारचे नुकसान; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगरातील भुरे मामलेदार बगीच्याजवळ एका कारचे कव्हर जाळून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शरद चौधरी वय 34 रा. कोल्हे नगर, जळगाव हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. मंगळवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान ते शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या भुरे मामलेदार बगीच्या जवळील प्लॉट नंबर 3 जवळ त्यांनी त्यांची (एमएच १९ सीएफ १७२३) क्रमांकांची कार पार्किंग करून कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी शिवाजीनगरातील अक्षय संजय अकोलकर आणि त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीने कारचे कव्हर जाळून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात दीपक चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय संजय अकोलकर व अज्ञात व्यक्तीवर सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस नाईक करुणासागर जाधव करीत आहे.

 

Exit mobile version