Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खतांची व इंधन दरवाढ रद्द करा — राष्ट्रवादी युवक कॉंग्रेची मागणी

रावेर, प्रतिनिधी ।  राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेरच्या वतीने  केंद्र सरकारने केलेल्या खतांची व पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द करावी अशा मागणीचे निवेदन नायब तहसिलदार सी.जे.पवार यांना निवेदन देऊन केंद्रसरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे ती कमी करावी,  देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी. यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु, केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊनही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु, यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी. त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली.  याप्रसंगी  रा.कॉ. तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, रा.यु.कॉ. जिल्हाकार्याध्यक्ष दिपक पाटील, रा.यु.कॉ. तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष प्रणित महाजन, रा.कॉ. तालुका सरचिटणीस वाय. डी. पाटील, अल्पसंख्याक सेल जि. उपाध्यक्ष युनूस खान, रा.यु.कॉ. रावेर उपाध्यक्ष कौशल शिंदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक महाजन, कॉन्ट्रॅक्टर किरण बारी, सोनू पाटील आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version