Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ शहरात श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मविआचा प्रचार दौरा

रावेर/भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार दौऱ्याला सुरूवात झाली असून शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने या दौऱ्यला उपस्थित लावली होती. भुसावळ शहरातील अष्टभुजा मातेचे दर्शन घेत भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार दौऱ्याला सुरूवात झाली. यावेळी सोबत रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार निळकंठ फालक, दलित नेते जगनभाऊ सोनवणे, हाजी सलीम, मुन्नवर खान, प्रा. उत्तम सुरवाडे, सचिन चौधरी व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर मित्र पक्षातील पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version