Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रीमंडळाच्या बैठकीत १२ विधानपरिषद सदस्यांच्या प्रस्तावाची शक्यता

 

मुंबई । राज्य मंत्रीमंडळाच्या आज दुपारी होणार्‍या बैठकीत राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव येण्याची शक्यता असून यात भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांचे नाव असेल अशी माहिती समोर आली आहे.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त होणार्‍या १२ सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव देखील याच बैठकीत संमत करण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे.

विधानपरिषदेच्या १२ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळणार आहेत. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून भाजपचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव असेल अशी शक्यता आहे. यामुळे प्रस्तावात नाव आल्यास एकनाथराव खडसे हे भाजप त्याग करणार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबतच्या घोषणेची औपचारीकताच बाकी राहणार आहे.

Exit mobile version