Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार : गुलाबराव पाटीलांना संधी शक्य

mantralay building

नागपूर, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप करण्यात आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असणाऱ्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे असून यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

 

नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने खातेवाटप केले. त्याचबरोबर हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ केला जाणार असल्याचे तिन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत. हिवाळी अधिवेशन सहा दिवस चालणार आहे. अधिवेशनाचे दोन दिवस संपले असून, केवळ चार दिवसच शिल्लक राहिले आहेत.

अधिवेशन संपल्यानंतर मावळत्या वर्षाच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी सहाजणांचा समावेश असणार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षामधील रामदास कदम, गुलाबराव पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, धनंजय यांच्यासह प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेना – रामदास कदम, अनिल परब, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल, संजय राठोड, सुहास कांदे.

काँग्रेस – अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर सुनील केदार, सतेज पाटील, के.सी. पाडवी, विश्वजीत कदम.

राष्ट्रवादी – अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड.

Exit mobile version