Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्रीपदावर असतांना ‘या’ १८ राजकारण्यांचा झालाय मृत्यू !

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज निधन झाले. पदावर असतांना निधन झालेले देशातील १८ वे मुख्यमंत्री बनण्याचा दुर्दैवी योग त्यांच्या नशिबी आला आहे.

माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज निधन झाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर मुख्यमंत्रीपदावर असतांना १७ मान्यवरांचा मृत्यू झाला होता. यात आता पर्रीकर यांची भर पडली आहे. या प्रकारे पदावर असतांना परलोकी गेलेल्या मुख्यमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

१) गोपीनाथ बारडोलोई ( आसाम – मृत्यू दिनांक ६ ऑगस्ट १९५०)

२) रत्नाकर शुक्ला (मध्यप्रदेश- दिनांक ३१ डिसेंबर १९५६)

३) कृष्ण सिंग ( बिहार – दिनांक ३१ जानेवारी १९६१)

४) बिधानचंद्र रॉय ( पश्‍चिम बंगाल- दिनांक १ जुलै १९६२)

५) मारोतराव कन्नमवार ( महाराष्ट्र- दिनांक २४ नोव्हेंबर १९६३)

६) बलवंतराय मेहता (गुजरात – दिनांक १९ सप्टेंबर १९६५)

७) सीएन अन्नादुराई ( तामिळनाडू- दिनांक ३ फेब्रुवारी १९६९)

८) ज्ञानेश्‍वर बांदोडकर ( गोवा- दिनांक १२ ऑगस्ट १९७३)

९) बरकतुल्लाह खान ( राजस्थान- दिनांक ११ ऑक्टोबर १९७३)

१०) शेख अब्दुल्ला ( जम्मू व काश्मिर- दिनांक ८ सप्टेंबर १९८३)

११) एमजी रामचंद्रन ( तामिळनाडू- दिनांक २४ डिसेंबर १९८७)

१२) चिमणभाई पटेल ( गुजरात- दिनांक १७ फेब्रुवारी १९९४)

१३) बेअंतसिंग (पंजाब- दिनांक ३१ ऑगस्ट १९९५)

१४) वायएस राजशेखर रेड्डी ( आंध्रप्रदेश- दिनांक २ सप्टेंबर २००९)

१५) दोरजे खांडू ( अरूणाचल प्रदेश, दिनांक ३० एप्रिल २०११)

१६) मुफ्ती मोहंमद सईद ( जम्मू व काश्मिर, दिनांक ७ जानेवारी २०१६)

१७) जे. जयललीता (तामिळनाडू- दिनांक ५ डिसेंबर २०१६)

१८) मनोहर पर्रीकर ( गोवा- दिनांक १७ मार्च २०१९)

याशिवाय, आयआयटीतून पदवी संपादन करणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर ही कामगिरी फक्त अरविंद केजरीवाल यांच्या नावे आहे.

Exit mobile version