Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरभीतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रेल्वे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरवातीला श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन करण्यात आले. नंतर विश्वशांतीसाठी वामनराव पै लिखित प्रार्थना मंजुषा राव ह्यांच्या सोबत उपस्थितांनी म्हटली. लक्ष्मी जोशीने भारतमातेची वेशभूषा केली होती. ह्यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले. अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांच्या हस्ते श्री गणपतीची आरती करण्यात झाली. स्वतंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून गणपती बाप्पांना 75 मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. ह्यावेळी सुरभीच्या सभासद मंजूषा राव, सुनीता सातपुते, अश्विनी जोशी, ज्योती भोकरडोळे, मेघा नाईक, साधना दामले, वैदेही नाखरे, वैशाली कुलकर्णी, अंजली धवसे, पल्लवी मोहरील, गायत्री जोशी, लक्ष्मी जोशी, सरोजताई वडकर, ह्यांनी सहकार्य केले.

रेल्वे कॉलनीतील सुनीता गांगुर्डे, विद्या चौधरी, विजया देव, लता झवर, जयश्री भालेराव, अर्चना फडके उपस्थित होत्या, महिलांनी पांढऱ्या, केशरी, हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. उपस्थितांनी जय हिंद, वंदे मातरम, भारतमाता की जय घोषणाचे नारे दिले.

Exit mobile version