Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस्स, एक बॉटल बिअर; सीसीटीव्हीत कैद झाली अजब चोरट्याची गजब करामत

बुलडाणा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फक्त एका बियरसाठी चोरट्याने वाईन शॉप फोडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरींचे सत्र कायम असून, आता तर चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. बुलडाणा शहरात मंगळवार दि. १९ जुलै च्या एकाच रात्रीत एक दोन नव्हे तर चार ठिकाणी चोरी झाली आहे.  

बुलडाणातील चक्क एका बियरच्या दुकान मधून चोरट्यांनी फक्त एक बिअरची बाटली चोरली तर याला काय म्हणावे ? असाच काहीसा प्रकार बुलढाणा वाईन शॉप च्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

शहरातील मा भगवती कॉम्प्लेक्समधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो, लाठे किराणा ही दुकाने रात्री २ वाजताच्या सुमारास फोडली असून या तीन दुकानात मधून शटर वाकवून रोख रक्कम व शटरचे नुकसान केले आहे. त्यानंतर साडेपाच वाजताच्या दरम्यान या चोरट्यांनी आपला मोर्चा संगम चौकातील ऋचा वाइन शॉपवर वळवला. या शॉपचे शटर वाकवून केवळ एक बियरची बॉटल चोरून चोरटे फरार झाले असून हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.

Exit mobile version