Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औषधी विक्रेत्यांना नाहक त्रास दिल्यास व्यवसाय बंद ठेवू : अनिल नावंदर

खामगाव,  प्रतिनिधी ।  बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरी सुध्दा पोलीस प्रशासनाकडून मेडीकल दुकानदार व कर्मचाऱ्यांवर  नाहक कारवाई होत असून हि कारवाई थांबविण्यात आली नाही तर नाईलाजास्तव व्यवसाय बंद ठेवावा लागेल असा इशारा अनिल नावंदर यांनी दिला आहे. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात १० मे च्या  रात्री ८ वाजेपासून ते २० मे च्या सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या काळात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत मेडीकल २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी एस. राममूर्ति यांनी आदेशाद्वारे दिली आहे. मात्र जिल्ह्यातील पोलीस प्रशासन मेडीकल व्यवसायाशी संबंधीत व्यक्तींवर चौकशी न करता कारवाईचा बडगा उगारत आहेत.  यासंदर्भात मेहकर, लोणार, मलकापूर व खामगांव येथून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत ११ मे रोजी मलकापूर येथील मेडीकलचा कर्मचारी व मुलगा औषधी पोहचविण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन आरटीपीसीआर टेस्ट पाहिजे असे सांगीतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लोणार येथील प्रतिष्ठीत औषधी विव्रेâता यांना सुध्दा पोलीसांनी क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली. अशा प्रकारे जिल्ह्यातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील केमिस्ट बांधव हतबल झाले असून औषधी विक्रीचा व्यवसाय करावा की नाही? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन केमिस्ट बांधव व कर्मचाऱ्यांना  पोलीसांकडून नाहक होणारा त्रास थांबविल्या गेला नाही तर शनिवार दि. १५ मे पासून जिल्ह्यातील संपूर्ण केमिस्ट बांधवांना नाईलाजास्तव लॉकडाऊनमध्ये सहभागी होतील असा गर्भित इशारा अनिल नावंदर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

Exit mobile version