Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बंद घर फोडले ; मोबाईलसह इतर वस्तू लंपास


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लिलापार्क आयोध्यानगरमधील बंद घर फोडत चोरट्यांनी मोबाईलसह इतर वस्तू लंपास केल्याच्या प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, अनंता भानुदास झोपे आणि तुषार विलास झोपे (दोघं रा.सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) येथील मुळ रहिवासी आहेत. हे दोघेही रेमंड कंपनीत ऑपरेटर म्हणुन काम कामाला आहेत. आयोध्यानगरात लिलापार्क येथील प्रभाकर पाटील यांच्या घरात भाड्याने खोली दोघं जण राहतात. बुधवार रात्रपाळीची ड्युटी असल्याने दोघेही रात्री ११वाजता रुम बंद करुन कामावर निघुन गेले. त्यानंतर आज सकाळी ७ वाजता दोघे रुमवर पोहचल्यावर त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. चोरट्यांनी ड्रॉवर मधील अनंताचा एक व तुषारचा दुसार असे 16 हजारांचे दोन महागडे मोबाईल, ब्लुटूथ, पेन ड्राईव्ह, कुकर, कपाटातील नवीन ड्रेस, असा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.

Exit mobile version