Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुऱ्हाणपुर अंकलेश्वर ते डोंगर कठोरा रस्त्याचे काम निकृष्ठप्रतिचे – शेखर पाटीलांची तक्रार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंकलेश्वर बुऱ्हाणपुर ते कठोरा रस्त्याचे काम सन २०१७ ते २०१८ मध्ये निविदा प्रमाणे मंजुर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला फेब्रुवारी २०२१मध्ये सुरूवात करण्यात आली. दरम्यान, सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असल्याची तक्रार पंचायत समितीचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील यांनी रावेर विधानसभा क्षेत्राचे आ. शिरीष चौधरी आणी कार्यकारी अभीयंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे केली आहे. 

या संदर्भात शेखर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , बुऱ्हाणपुर अकलेश्वर रोड ते डोंगर कठोरा या सुमारे पाच किलोमिटर रस्त्याचे काम हे मागील पाच वर्षापुर्वीच मंजुर करण्यात आले असता सदरचे काम प्रत्यक्षात संबंधीत ठेकेदारांने मागील फेब्रुवारी २०२१मध्ये या कामास सुरूवात केली असुन , सदरचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असुन , ठेकेदाराकडुन या रस्त्याचे काम निकृष्ठ प्रति चे होत असुन, रस्त्याचे सरफेज काम हे ओबड धोबड केली आहे . तरी संबधीत विभागाने तात्काळ हे होत असलेले निकृष्ठ प्रति चे काम थांबवावे व सदर ठेकेदाराकडुन रस्त्याच्या कामाची सरफेज प्लेन करण्यात यावे अन्यथा ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये असे आपल्या तक्रार अर्जात पंचायत समितीचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांनी नमुद केले आहे .

 

Exit mobile version