बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात बंद असलेले घर फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख २ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ललित राजेसिंग राजपूत (वय-४०) रा. गंगुबाई नगर, पारोळा हे म्हसवे येथील आयडीबीआय बँकेत नोकरीला आहे. २ मे सकाळी ११ ते घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत मुख्य घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले ७० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.

 

Protected Content