Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्द महिलेच्या घरात चोरी; ५४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावातील महादेव मंदिराजवळील वृध्द महिलेच्या घराचे कडी कोयंडा कापून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ५४ हजार ३३० रुपये किमतीचा मध्यमात अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, लक्ष्मीबाई सुपडू लोखंडे (वय-६६) रा.कुऱ्हाड ता.पाचोरा या वृद्ध महिला वास्तव्याला आहे. २ नोव्हेंबर सकाळी ६ ते ५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वृध्द महिलेचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा कापून आत प्रवेश करत घरातून ठेवलेले सोने व चांदीचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा ५४ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद मोरे करीत आहे.

 

Exit mobile version