Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात घरफोडी; सात लाखांचा ऐवज लंपास

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वैष्णवीनगर परिसरातील एका घरातून चोरट्यांनी तब्बल सात लाखांचे ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

कोरोनामुळे सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू केल्याने कित्येक परिवार बाहेर गावी अडकून होते.या दरम्यान चोरचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढले होते.तर कोरोना झालेले रुग्ण उपचार घेत असतांना त्यांची घरी बंद असल्याने यांचा फायदा चोरट्यांनी घेऊन अनेक घरामध्ये लॉकडाउनच्या दरम्यान घरफोड्या केल्या होत्या.लॉकडाउनच्या काळात २० मार्चपासून ते अदयापवतो फिर्यादी प्रतिमा महेंद्र मगरे (वय ४८ राहणार वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा) हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असतांना अचानक सरकारने लॉकडाउन केल्याने फिर्यादी बाहेर गावी अडकल्या होत्या.

आज रोजी ते आपल्या घरी आले असता त्यांच्या घराला लावण्यात आलेले कुलूप व कडी कोंडा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,प्रभारी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली घरातील सोन्याच्या वस्तू,टी.व्ही.एसी.असे ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २० मार्च २०२० ते अदयापावतो दरम्यान घडली आहे.

बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ८३७/२०२० भादवी कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे सह पोना समाधान पाटील करीत आहे.

Exit mobile version