Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्री येथे बंद घरात चोरी; १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री बु” येथील बंद घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन संसारोपयोगी वस्तुंसह २ हजार रुपये संशयीत आरोपीने चोरुन नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “आज शनिवार, दि. ९ जुलै रोजी पिंप्री बु” ता. पाचोरा येथील रहिवाशी पुष्पाबाई प्रभाकर नेरपगार (वय – ६५) ह्या घरी नव्हत्या. त्यामुळे संधी साधून त्यांच्या घरात अज्ञात आरोपीने प्रवेश करत घरातील टेबल फॅन, एक तांब्याचे गंगाळ, एक मिक्सर, एक ५ लिटरचा कुकर, एक छत्री व २ हजार रुपये रोख असा १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

पुष्पाबाई नेरपगार यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शिंदे हे करीत आहे.

Exit mobile version