Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील पारधी वाडा येथे एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे रा. पारधी वाडा, धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले, यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असतांना कशानेतरी रूमाल सुगवून बेशुध्द केले. व लोखंडी कपाटातील २० हजार रूपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल लांबविला. शिवाय याच परिसरातील इतर दोन ठिकाणी चोरी केली परंतू चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी मधुकर दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच परिसरात अनेकवेळा चोरी झालेल्या आहे. पोलीसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.

Exit mobile version